राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० दशा आणि दिशा

Original price was: ₹650.00.Current price is: ₹500.00.

Category: Tags: ,

भारताच्या स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रासाठी तीन राष्ट्रीय धोरणे आली. १९६८ चे पहिले धोरण, १९८६ चे दुसरे धोरण (१९९२ मध्ये सुधारित) आणि २९ जुलै २०२० रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०. जवळपास चौतीस वर्षांनंतर आलेले हे धोरण केवळ जुन्या धोरणाची सुधारणा नाही, तर भारतीय शिक्षणाचा संपूर्ण आराखडा नव्याने मांडणारा दस्तऐवज आहे.

या धोरणाबद्दल समाजात उत्सुकता आहे, आशा आहे आणि काही प्रमाणात संभ्रमही आहे. पालकांना प्रश्न पडतो की आपल्या मुलाचे शिक्षण आता कसे होईल. विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की श्रेयांक, बहुप्रवेश-बहिर्गमन आणि लघु विषय (मायनर) म्हणजे नेमके काय. शिक्षकांना प्रश्न पडतो की अध्यापन पद्धती, मूल्यमापन आणि संशोधन यांत कोणते बदल अपेक्षित आहेत. संस्थाचालकांना प्रश्न पडतो की स्वायत्तता, मानांकन आणि बहुविद्याशाखीय रचना कशी साधायची.

या सर्व प्रश्नांची सोप्या मराठी भाषेत उत्तरे देण्याचा हा प्रयत्न आहे. पुस्तकाचे शीर्षक ‘दशा आणि दिशा’ हे जाणीवपूर्वक निवडले आहे. ‘दशा’ म्हणजे आज आपले शिक्षण कुठे उभे आहे, धोरणाची अंमलबजावणी किती झाली आणि कोणत्या अडचणी आल्या. ‘दिशा’ म्हणजे पुढे कुठे जायचे, कसे जायचे आणि त्यासाठी प्रत्येक घटकाने काय करायचे.

हे पुस्तक प्रामुख्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, शालेय शिक्षक, शिक्षणशास्त्राचे अभ्यासक, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रशासक यांच्यासाठी लिहिले आहे. ग्रामीण भागातील अभियांत्रिकी महाविद्यालयात काम करताना आम्हाला जे अनुभव आले, त्यांचा प्रत्यक्ष संदर्भ पुस्तकात ठिकठिकाणी दिला आहे.

There are no reviews yet.

Be the first to review “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० दशा आणि दिशा”

wpChatIcon
wpChatIcon